!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

Monday, May 17, 2010

रौप्य महोत्सव


रौप्य महोत्सव दिनांक १२ मे ते १४ मे २०१०
आपना सर्वांना माहितच आहे की आपल्या संघाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाल्याकारणाने कुरंग ग्राम सेवा संघ आणि संलग्नित युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ते १४ मे २०१० या कालावधि दरम्यान वर्धापन दिन, रौप्य महोत्सव आणि वार्षिक स्नेह सम्मलेन असा भरगच्च कार्यक्रम मौजे कुरंग येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रम दरम्यान स्थानिक ग्रामास्थान समवेत मुंबईत राहणारे समस्त कुरंगवासिय आणि आपले समस्त पाहुणे मंडळी यानी सदर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिति लावली. तसेच ज्य़ा देनागिदारान्नी भरगोस देणगी देऊन आम्हाला उपकृत केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सदर कार्यक्रमात सतत ३ दिवस पूजा, हरिपाठ, आरती आणि सायं. दीपोत्सव असा दिनक्रम होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कार्यक्रमात सर्वच मंडळी आवर्जुन सहभाग घेत होते. दिनांक १२ मे रोजी नेहमी प्रमाणे पहाटे काकड आरती, नंतर श्री कुरंगादेवीच अभिषेक, पूजा, प्रसाद वाटप, दुपारी ११.३० वा. दिंडी सोहळा आणि त्यानंतर महाप्रसाद, सायं. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक १३ मे रोजी सकाळी महिलांसाठी "कुरंग गावाची होम मिनिस्टर" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी उत्स्फूर्त भाग घेतला. त्यानंतर सायं. रामेश्वर नाट्य मंडळाने "बाळा जो जो रे" हा ३ अंकी नात्य प्रयोग सदर केला. दिनांक १४ मे रोजी संघाचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर संमेलानादाराम्यान कुरंग गावातील ज्येष्ठ नागरिकांचा तसेच संघासाठी अविरत आणि एकनिष्ठेने सदैव कार्यरत असणाऱ्या तसेच दिवंगत झालेल्या कार्यकर्त्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर लहान मुलांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कुरंग ग्राम सेवा संघाने आयोजित केलेल्या स्नेह संमेलनात आपल्या स्मरणिकचे संघाचे उपाध्यक्ष श्री अशोक के. कदम आणि कार्याध्यक्ष श्री प्रदीप का. कदम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर प्रसंगी संघाचे सरचिटनीस विशाल सु. विश्वासराव आणि खजिनदार विजय रा. कदम हे ही उपस्थित होते.
अशा या कुरंग ग्राम सेवा संघाच्या ३ दिवसीय रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता दिनांक १४ मे रोजी दुपारी स्नेह भोजनाने करण्यात आली.
शब्दांकन - रवि विश्वासराव