!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

Wednesday, August 27, 2014

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…

हार्दिक शुभेच्छा !!!



कुरंग गावातील तसेच पंचक्रोशीतील समस्त गावकऱ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा… 

श्रीगणेश आपणा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच सदिच्छा…. 

शुभेच्छुक 
संपादक 
मुक्काम पोष्ट कुरंग 

Tuesday, August 26, 2014

अल्प परिचय - मुक्काम पोष्ट कुरंग


अल्प परिचय - मुक्काम पोष्ट कुरंग

कुरंग हे एक छोटस गाव, सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी आणि कोकणच्या मातीत वसलेलं एक छोटस गाव. मुंबई पासून अंदाजे ४५० की.मी. अंतरावर मुंबई गोवा हायवेवर रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात वाटूळ नक्यावारून २० की.मी. आत कुरंग गाव वसलेलं आहे.

कुरंग येथे पोहोचण्यासाठी कोकण मुंबई गोवा मार्गे -
कोकण रेल्वे ने जायचे झाल्यास जवळचे स्टेशन विलवडे. येथे केवळ राज्यराणी आणि कोकणकन्या या दोन एक्स्प्रेस आणि दिवा सावंतवाडी पेसेंजर थांबते. इतर रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून सकाळी आणि संध्याकाळी रत्नागिरी झर्ये हि गाडी उपलब्ध आहे अन्यथा रत्नागिरी वरून व्हाया लांजा आणि वाटूळ यावे लागते.

बस ने प्रवास करावयाचा झाल्यास वाटूळ नाक्यावरून गोव्याच्या दिशेने येताना डाव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने अंदाजे २० कि. मी. प्रवास केल्यास आपण कुरंग येथे पोहचू शकतो.

कोल्हापुर मार्गे प्रवास करण्यासाठी अनुस्कुरा घाटाने पाचल मार्गे आपण व्हाया रिंगणे कोंड आपण कुरंग येथे पोहोचू शकता.

कुरंग येथे पोहोचण्यासाठी राजापूर, पाचल, लांजा आणि रत्नागिरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच रिक्षा हि उपलब्ध आहेत.

शेजारची गावे -
झर्ये, कोंडगे, रिंगणे

गावातील वाड्या
रामेश्वर वाडी, सुर्वे वाडी, मधली वाडी, गुरव वाडी, वरची वाडी, पठार वाडी आणि बांध वाडी

जिल्हा - रत्नागिरी
तालुका - लांजा

ग्रामदैवत -
श्री. कुरंगा देवी 


श्री देव रामेश्वर. 










मुख्य कार्यक्रम -
गणेशोत्सव, शिमगा, १२ मे (कुरंगादेवी मंदिर जीर्णोद्धार दिन), महाशिवरात्री, गोकुळाष्टमी

कार्यरत संस्था -

१. कुरंग ग्राम पंचायत 
२. कुरंग ग्राम सेवा संघ - कार्यक्षेत्र - मुंबई आणि मौजे कुरंग 

प्रेक्षणीय स्थळ -
रामेश्वर मंदिर, कुरंगा देवी मंदिर, आसर कोंड, शेरानीचे खोर, पाझर तलाव, सह्याद्री पर्वत रांग

 


गावातील नदी -
नावेरी नदी, शेरनीची नदी 







शब्दांकन - रवि विश्वासराव

Monday, May 17, 2010

रौप्य महोत्सव


रौप्य महोत्सव दिनांक १२ मे ते १४ मे २०१०
आपना सर्वांना माहितच आहे की आपल्या संघाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाल्याकारणाने कुरंग ग्राम सेवा संघ आणि संलग्नित युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ते १४ मे २०१० या कालावधि दरम्यान वर्धापन दिन, रौप्य महोत्सव आणि वार्षिक स्नेह सम्मलेन असा भरगच्च कार्यक्रम मौजे कुरंग येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रम दरम्यान स्थानिक ग्रामास्थान समवेत मुंबईत राहणारे समस्त कुरंगवासिय आणि आपले समस्त पाहुणे मंडळी यानी सदर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिति लावली. तसेच ज्य़ा देनागिदारान्नी भरगोस देणगी देऊन आम्हाला उपकृत केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सदर कार्यक्रमात सतत ३ दिवस पूजा, हरिपाठ, आरती आणि सायं. दीपोत्सव असा दिनक्रम होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कार्यक्रमात सर्वच मंडळी आवर्जुन सहभाग घेत होते. दिनांक १२ मे रोजी नेहमी प्रमाणे पहाटे काकड आरती, नंतर श्री कुरंगादेवीच अभिषेक, पूजा, प्रसाद वाटप, दुपारी ११.३० वा. दिंडी सोहळा आणि त्यानंतर महाप्रसाद, सायं. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक १३ मे रोजी सकाळी महिलांसाठी "कुरंग गावाची होम मिनिस्टर" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी उत्स्फूर्त भाग घेतला. त्यानंतर सायं. रामेश्वर नाट्य मंडळाने "बाळा जो जो रे" हा ३ अंकी नात्य प्रयोग सदर केला. दिनांक १४ मे रोजी संघाचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर संमेलानादाराम्यान कुरंग गावातील ज्येष्ठ नागरिकांचा तसेच संघासाठी अविरत आणि एकनिष्ठेने सदैव कार्यरत असणाऱ्या तसेच दिवंगत झालेल्या कार्यकर्त्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर लहान मुलांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कुरंग ग्राम सेवा संघाने आयोजित केलेल्या स्नेह संमेलनात आपल्या स्मरणिकचे संघाचे उपाध्यक्ष श्री अशोक के. कदम आणि कार्याध्यक्ष श्री प्रदीप का. कदम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर प्रसंगी संघाचे सरचिटनीस विशाल सु. विश्वासराव आणि खजिनदार विजय रा. कदम हे ही उपस्थित होते.
अशा या कुरंग ग्राम सेवा संघाच्या ३ दिवसीय रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता दिनांक १४ मे रोजी दुपारी स्नेह भोजनाने करण्यात आली.
शब्दांकन - रवि विश्वासराव